Luke 8:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेरोदाच्या घराचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना, सूसान्ना आणि इतर अनेक स्त्रिया होत्या, या स्त्रिया त्यांच्याकडे जे होते, म्हणजे त्यांच्या उत्पन्नातून येशू व त्याच्या शिष्यांना देत असत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि हेरोदचा कारभारी च्युजा ह्याची पत्नी योहान्ना, तसेच सुसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या साधनसंपत्तीने त्यांची सेवा करीत असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सूसान्ना व दुसर्या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेरोदाचा घरगुती कारभारी खुजा, त्याची पत्नी योहान्ना, सुसान्ना व इतर अनेक स्त्रिया, स्वतःच्या मिळकतीतून त्यांना मदत करीत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेरोदाचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना तसेच सूसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया, या आपल्या द्रव्याने त्यांची सेवा करीत असत.