Luke 8:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा डुकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले, तेव्हा ते दूर पळाले व त्यांनी नगरात व त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
झालेला हा प्रकार पाहून कळप चारणारी माणसे पळाली आणि त्यानी गावात व शेतामळ्यात जाऊन हे वृत्त लोकांना सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतामळ्यांत जाऊन हे वर्तमान सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
डुकरांचे कळप राखणार्‍यांनी काय घडले ते पाहिले आणि त्यांनी धावत जाऊन ही बातमी जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात सांगितली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले.