Luke 8:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे व प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत, तेव्हा येशू बोधकथांचा उपयोग करुन बोलत असे:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एकदा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व नगरोनगरीचे लोक त्याच्याजवळ आले असता येशू दाखला देऊन म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व गावोगावचेही लोक त्याच्याजवळ आले असता तो दाखला देऊन म्हणाला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोकांची मोठी गर्दी होत होती आणि वेगवेगळ्या गावांमधून लोक येशूंकडे येत होते, त्यावेळेस त्यांनी हा दाखला सांगितला:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मोठा समुदाय एकत्र जमला असता व गावोगावचे लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देऊन म्हणाला,