Luke 9:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु मी तुम्हांला खरे सांगतो येथे उभे राहिलेल्यांमध्ये असे काही आहेत की, स्वार्गाचे राज्य पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असणाऱ्यांत काही जण असे आहेत की, देवाचे राज्य पाहिल्याविना त्यांना मरण येणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असणार्यांत कोणी असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी तुम्हाला निश्चित सांगतो, येथे उभे असणारे काहीजण परमेश्वराचे राज्य पाहीपर्यंत, त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”