Luke 9:49 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु योहानाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही कोणाला तरी तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, व आम्ही त्याला मना केले, कारण आम्ही जे तुम्हांला अनुसरतो त्यापैकी तो नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योहानने म्हटले, “गुरुवर्य, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली कारण तो आपला अनुयायी नव्हता.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योहानाने म्हटले, “गुरूजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले; तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्याबरोबर तुम्हांला अनुसरत नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले आणि त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यापैकी नव्हता.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, “हे गुरु, आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भूते काढतांना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्यामागे चालत नाही.”