Luke 9:57 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते रस्त्याने चातल जात असता कोणी तरी त्याला म्हणाले, “तू जेथे कोठे जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते वाटेने चालत असता एका माणसाने येशूला म्हटले, “आपण जेथे कोठे जाल, तेथे मी तुमच्या मागे येईन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा असे झाले की, ते वाटेने चालत असता कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते रस्त्याने जात असताना, एका मनुष्याने येशूंना म्हटले, “आपण जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यामागे येईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ते वाटेने चालत असता कोणीएक त्यास म्हणाला, “जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”