Malachi 1:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणाला, “तुम्ही अशुध्द भाकरी माझ्या वेदीजवळ आणता.” पण तुम्ही विचारता “ती कशामुळे ती भाकरी अशुध्द झाली?” परमेश्वर म्हणाला, “माझ्या मेजाचा (वेदीचा) तुम्ही आदर करीत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढवता. तरी तुम्ही विचारता, ‘आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळले?’ तुम्ही म्हणता, ‘परमेश्वराचे मेज तुच्छ आहे;’ असे तुम्ही बोलता तेणेकरून तुम्ही ते विटाळवता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्ही माझ्या वेदीवर भ्रष्ट अर्पणे आणता तेव्हा. “परंतु तुम्ही विचारता, ‘आम्ही तुम्हाला कसे अमंगळ केले?’ “याहवेहचा मेज तुच्छ आहे असे तुमच्या म्हणण्याने.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही अशुद्ध भाकरी माझ्या वेदीवर अर्पण करता. आणि म्हणता, ‘कशामुळे आम्ही तुला विटाळवीले?’ परमेश्वराचा मेज तुच्छ आहे, असे बोलून तुम्ही ते विटाळवता.