Malachi 2:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आमचा पिता (देव) एकच आहे. आपल्यातील प्रत्येकाला एकाच देवाने निर्माण केले आहे. मग लोक आपल्या भावांनाच का फसवितात? ते लोक कराराचा मान ठेवीत नाहीत. आमच्या पूर्वजांनी देवाशी केलेल्या कराराचा ते मान राखत नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय? एकाच देवाने आम्हांला उत्पन्न केले नाही काय? असे असताना आम्ही आपापल्या बंधूचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो बरे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपण सर्व एकाच पित्याची मुले नाही का? आपल्याला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? मग आपण एकमेकांचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आम्हास एकच पिता नाही काय? एकाच देवाने आपल्याला निर्माण केले नाही काय? मग आम्ही आपापल्या भावाविरुद्ध विश्वासघात करून आपल्याच पूर्वजांचा करार का मोडतो?