Malachi 2:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूद्यांच्या लोकांनी इतरांना फसविले. यरुशलेमवासीयांनी आणि इस्राएल लोकांनी भयानक कृत्ये केली. यहूद्यांच्या लोकांनी परमेश्वराच्या पवित्र मंदिराचा अपमान केला. देवाला ते स्थान प्रिय आहे. यहूद्यांच्या लोकांनी त्या परक्या देवतेची पूजा करण्यास सुरवात केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदा विश्वासघात करत आहे, इस्राएलमध्ये व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे; म्हणजे यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, व परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाने विश्वासघात केला आणि यरूशलेम व इस्राएलमध्ये तिरस्कारणीय गोष्टी केल्या आहेत. यहूदाने परमेश्वरास प्रिय असलेले पवित्र स्थान विटाळवीले आणि परक्या देवाच्या कन्येशी लग्न केले आहे.