Malachi 2:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या लोकांना, परमेश्वर, यहूदाच्या कुळांतून वगळेल. ते कदाचित् परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी आणतील. पण त्याचा उपयोग होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो मनुष्य असे करतो तो हाक मारणारा असो, उत्तर देणारा असो, किंवा सेनाधीश परमेश्वराला यज्ञार्पण करणारा असो, त्याला परमेश्वर याकोबाच्या डेर्यातून नाहीसे करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याने अशी गोष्ट केली आहे, मग तो कोणीही असो, तो सर्वसमर्थ याहवेहस अर्पणे वाहत असेल तरीही याहवेह त्याला याकोबाच्या तंबूमधून काढून टाको.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी मनुष्य असे करतो आणि जो कोणी सेनाधीश परमेश्वरास अर्पण करतो त्यालाही परमेश्वर याकोबाच्या डेऱ्यातून काढून टाकील.