Malachi 2:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणाला, “मी लेवीबरोबर करार केला. मी त्याला जीवन व शांती देण्याचे वचन दिले. आणि मी ते त्याला दिले. लेवीने मला मान दिला. त्याने माझ्या नावाचा आदर केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांच्याबरोबर केलेला करार जीवनाचा व शांतीचा होता; त्याने भय धरावे म्हणून मी ती त्याला दिली होती आणि त्याला माझी भीती वाटली व माझ्या नावाचा त्याला धाक वाटला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझा करार लेवी वंशाशी होता, जीवन आणि शांतीचा करार आणि मी हे सर्व त्याला दिले; हे प्राप्त व्हावे म्हणून आदर करण्याची गरज होती आणि त्याने मला आदर दिला व माझ्या नामाचे भय बाळगले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“लेवीबरोबर केलेला माझा करार हा जीवनाचा व शांतीचा होता, आणि त्याने माझा सन्मान करावा ह्यासाठी मी त्यास तो दिला. त्यांनी मला सन्मानित केले आणि माझ्या नावाचे भय त्यास वाटले.