Malachi 2:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणाला, “तुम्ही याजकांनी मला अनुसरायचे सोडून दिले. तुम्ही अनेक लोकांना चुकीने वागण्यासाठी आपल्या शिकवणुकीचा उपयोग केलात. लेवीबरोबरच्या कराराचा तुम्ही भंग केलात.” सर्वशक्तिमान परमेश्वर हे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तुम्ही मार्ग सोडून गेला आहात, नियमशास्त्राच्या मार्गात पुष्कळांना तुम्ही ठोकर खायला लावले आहे; तुम्ही लेव्यांचा करार बिघडवला आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तुम्ही पथभ्रष्ट झाला आहात व तुमच्या शिक्षणामुळे अनेकजण अडखळून पडले आहेत; तुम्ही लेव्याचा करार विपरीत केला आहे,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“परंतु तुम्ही सत्याच्या मार्गावरून फिरले आहात. तुम्ही अनेक लोकांस नियमशास्राविषयी अडखळण्याचे कारण झाले आहात. लेवीचा करार तुम्ही भ्रष्ट केला आहे.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.