Malachi 3:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग यरुशलेम व यहुदा यांच्याकडून परमेश्वर भेटी स्वीकारील. हे सर्व अगदी पूर्वीसारखे असेल प्राचीन काळासारखेच हे असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षांप्रमाणे यहूदा व यरुशलेम ह्यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग पूर्वीच्या दिवसाप्रमाणे आणि गतवर्षासारखे पुन्हा एकदा यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी आणलेली अर्पणे याहवेहस मान्य होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा जसे पुरातन दिवसात आणि प्राचीन वर्षात तसे यरूशलेम व यहूदाची अर्पणे परमेश्वरास सुखकारक असतील.