Malachi 3:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. लोकांनी केलेल्या वाईट गोष्टी न्यायाधीशाला सांगणाऱ्या माणसाप्रमाणे मी असेन काही लोक दुष्टपणे जादूटोणा करतात. काही व्यभिचाराचे पाप करतात. काही खोटी वचने देतात. काही आपल्या मजुरांना फसवितात. ते मजुरांना कबूल केल्याप्रमाणे मजुरी देत नाहीत. लोक विधवांना व अनाथांना मदत करीत नाहीत. परक्याला कोणी मदत करीत नाही. माझा लोक मान राखत नाहीत.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. आणि जादूटोणा, व्यभिचार, खोटी शपथ वाहणारे, आणि जे मोलकऱ्याला मोलाविषयी आणि विधवेला व अनाथाला पीडतात, आणि परराष्ट्रीयांचा न्याय विपरीत करतात, आणि माझे भय धरीत नाही यांच्याविरूद्ध मी त्वरीत साक्षी होईन,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.