Mark 1:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू रानात चाळीस दिवस होता. तो तेथे हिंस्त्र प्राण्यांबरोबर होता. तो तेथे असता सैतान त्याला मोह पाडून त्याची परीक्षा बघत होता. पण दूत येऊन त्याची सेवा करीत होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो त्या ठिकाणी चाळीस दिवस राहिला. तेथे वनपशूदेखील होते. मात्र देवदूत त्याची सेवा करत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत त्याची सेवा करत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रानात चाळीस दिवस असताना, सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या सोबतीला जंगली प्राणी होते आणि देवदूतांनी त्यांची सेवा केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.