Mark 1:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू गालीलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एकदा गालील सरोवराजवळून जात असताना येशूला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते कोळी होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर गालील समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.