Mark 1:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, देवाचा पवित्र असा तू आहेस.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि ओरडून म्हणाला, “हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो ओरडून म्हणाला, “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे नासरेथकर येशू, तुम्हाला आमच्याशी काय काम? तुम्ही आमचा नाश करावयास आले काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन आहेस!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.”