Mark 10:33 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ऐका! आपण वर येरूशलेमेस जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्याला मरणाची शिक्षा देतील आणि ते त्याला यहूदीतर लोकांच्या हाती देतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“ऐका, आपण यरुशलेमला जात आहोत, तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला देहान्ताची शिक्षा देतील आणि नंतर परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल; ते त्याला देहान्त शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आपण यरुशलेमात जात आहोत” ते म्हणाले, “तिथे मानवपुत्राला प्रमुख याजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि गैरयहूदी लोकांच्या स्वाधीन करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“पाहा! आपण वर यरूशलेम शहरास जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र धरून मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्यास मरणाची शिक्षा देतील आणि ते त्यास परराष्ट्रीय लोकांच्या हाती देतील.