Mark 10:46 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते यरिहो येथे आले. येशू, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरिहो सोडून जात असता, तिमयचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर ते यरीहोस आले. मग तो, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता, तीमयाचा मुलगा बार्तीमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग येशू यरीहो शहरात आले. तिथे येशू आणि त्यांचे शिष्य, मोठ्या समुदायासह शहर सोडून जात असताना, तीमयाचा पुत्र बार्तीमय हा आंधळा, येशू ज्या रस्त्याने चालले होते, त्या रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ते यरीहो शहरास आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तीमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.