Mark 11:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने दूर असलेल्या व पानांनी भरलेल्या अंजिराच्या झाडाकडे पाहिले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्याला पानाशिवाय काही आढळले नाही. कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पानांनी भरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. कदाचित झाडावर काही मिळेल, ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले, आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला; परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही; कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही अंतरावर पानांनी बहरलेले एक अंजिराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले, त्यावर काही फळे सापडतील या शोधार्थ ते तिथे गेले. तिथे पोहोचल्यावर, त्यांना फक्त पानांशिवाय काही आढळले नाही, कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास पानांनी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्यास पानांशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता.