Mark 12:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर त्यांनी त्याला चुकीचे बोलताना पकडावे म्हणून काही परुशी व हेरोदी यांना. त्याच्याकडे पाठविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी येशूला बोलण्यात पकडण्याकरता काही परुश्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर त्यांनी त्याला बोलण्यात धरण्याकरता परूशी व हेरोदी ह्यांच्यातील काहींना त्याच्याकडे पाठवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही काळानंतर येशूंना शब्दात पकडावे, या उद्देशाने काही परूशी व हेरोदियांना पाठविण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्यांनी त्यास चुकीचे बोलताना पकडावे म्हणून काही परूशी व काही हेरोदी लोकांस त्याच्याकडे पाठवले.