Mark 12:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“गुरुजी. मोशाने आमच्यासाठी असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मेला व पत्नी राहिली, परंतु मूलबाळ नसले तर वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मेलेल्या भावाचा वंश वाढवावा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी अशी आज्ञा लिहून ठेवली आहे की, कोणा एकाचा भाऊ निधन पावला आणि त्याची पत्नी मागे राहिली व त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने तिच्याबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘कोणाएकाचा भाऊ मेला, आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी विचारले, “गुरुजी, मोशेने आपल्यासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“गुरुजी. मोशेने आमच्यासाठी पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मरण पावला व त्याची पत्नी मागे राहिली, परंतु त्यांना मूलबाळ नसले तर आपल्या भावाच्या वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मरण पावलेल्या भावाचा वंश वाढवावा.