Mark 12:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरूत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मेलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग पुनरुत्थानसमयी ते सर्व उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याबरोबर विवाह केला होता.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर पुनरुत्थानसमयी ते उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिला बायको करून घेतले होते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी विवाह केला होता?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरुत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.”