Mark 12:28 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घातलाना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञांत महत्त्वची पाहिली आज्ञा कोणती?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांचा वाद ऐकून व त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले, हे पाहून शास्त्र्यांपैकी एक जण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणी एक नियमशास्त्र शिक्षक तिथे आला व त्याने त्यांचा वाद ऐकला. येशूंनी योग्य उत्तर दिले आहे, हे पाहून त्याने येशूंना विचारले, “सर्व आज्ञांपैकी महत्त्वाची कोणती आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घालताना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञा पैकी महत्त्वाची अशी पहिली आज्ञा कोणती?”