Mark 13:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“अंजिराच्या झाडापासून धडा घ्या. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हांला उन्हाळा जवळ आला हे समजते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अंजिराच्या झाडापासून एक धडा शिकून घ्या. त्याच्या कोवळ्या डाहळ्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला, हे तुम्हांला कळते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे हे तुम्हांला कळते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका: त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंजिराच्या झाडापासून शिका. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हास उन्हाळा जवळ आला हे समजते.