Mark 14:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एक जण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवीत आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. तो माझ्याबरोबर जेवणात भाग घेत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल, तो माझ्याबरोबर जेवणारा आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते सर्व मेजाभोवती बसून भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल—तो माझ्याबरोबर पंक्तीला बसून जेवत आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एकजण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवण करीत आहे.”