Mark 14:54 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे थेट मुख्य याजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र पहारेकऱ्याबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काही अंतर ठेवून मागे येत असलेला पेत्र रक्षकांबरोबर उच्च याजकांच्या वाड्यातील शेकोटीजवळ बसला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पेत्र दुरून त्याच्यामागून चालत आत म्हणजे प्रमुख याजकाच्या वाड्यातील अंगणात गेला आणि कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि तिथे तो पहारेकर्यांसोबत जाऊन बसला आणि शेकोटीजवळ ऊब घेत बसला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे सरळ महायाजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.