Mark 15:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वाटेत त्यांना कुरेने येथील शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो अलेक्सांद्र व रुफ यांचा पिता होता व आपल्या शेतातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्याला जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
गावातून शहराकडे जायला निघालेला शिमोन नावाचा माणूस त्यांना वाटेत भेटला. शिपायांनी त्याच्यावर बळजबरी करून त्याला येशूचा क्रूस वाहण्यास भाग पाडले. शिमोन कुरेनेकर होता व आलेक्झांद्र व रूफ ह्यांचा तो बाप होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर, म्हणजे आलेक्सांद्र व रूफ ह्यांचा बाप, हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कुरेने गावचा एक रहिवासी, आलेक्सांद्र व रूफस यांचा पिता शिमोन रानातून परत येत होता व जवळून जात असता, त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाटेत त्यांना कुरेनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले.