Mark 16:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुर्वार्तेची घोषणा केली. प्रभुने त्यांच्याबरोबर कार्य केले, व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी तेथून निघून शुभवर्तमानाची घोषणा सर्वत्र केली. त्या वेळी प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणाऱ्या चिन्हांद्वारे त्यांच्या संदेशाचे समर्थन करत होता.] प्रस्तुत शुभवर्तमानाचा शेवट एका प्राचीन हस्तलिखितात अशा प्रकारे केलेला आढळतो: निराळ्या प्रकारचा शेवट [त्या स्त्रियांनी जे काही पाहिले होते ते सर्व पेत्र आणि त्याचे सोबती ह्यांना सांगितले. ह्यानंतर स्वतः येशूने त्याच्या शिष्यांद्वारे तारणाचा पवित्र व शाश्वत संदेश जगभर पाठवला.]
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यानंतर त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणार्‍या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता.]
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुवार्तेची घोषणा केली. प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.