Mark 2:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर येशू लेवीच्या घरी जेवत असता पुष्कळ जकातदार व पापी लोकही येशू व त्यच्या शिष्यांबरोबर जेवत होते. कारण तेथे जे त्याच्यामागे आले होते त्यांच्यापैकी पुष्कळ जण होते,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर येशू त्याच्या घरी जेवायला बसला असता, तेथे पुष्कळ जकातदार व पापी लोक येशूच्या मागे आले आणि तेदेखील येशू व त्याच्या शिष्यांबरोबर पंक्‍तीस बसले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर असे झाले की, तो त्याच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस बसले; कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू आणि त्यांचे शिष्य लेवीच्या घरी भोजन करत असताना, त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार व पापी लोक भोजन करत होते. कारण येशूंच्या मागे आलेले पुष्कळजण तिथे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर असे झाले की येशू लेवीच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर जेवत होते कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते.