Mark 2:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू म्हणाला, “खरोखर जोपर्यंत वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपयंर्त त्यांनी उपास करावा अशी तुमची अपेक्षा आहे काय? जोपर्यंत त्यांच्याबरोबर वर आहे तोपयंर्त त्यांना उपास करणे शक्य नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्याना उपवास करता येईल का? वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू त्यांना म्हणाला, “वर्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय? वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना उपवास कसे करू शकतात? जोपर्यंत वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत ते उपवास करू शकत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपवास करणे त्यांना शक्य आहे काय? वर बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही.