Mark 2:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड आकसून जाईल व जुन्याला अधिक फाडील व ते अधिकच फाटेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नवीन कापडाचे ठिगळ कोणी जुन्या वस्त्राला लावत नाही. तसे केले तर नीट करण्याकरता लावलेले ठिगळ जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी कोर्‍या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही; लावले तर धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्याला, म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नवीन कापडाचा तुकडा जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. नाहीतर ते नवीन ठिगळ वस्त्राला फाडेल आणि छिद्र अधिक मोठे होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड जुन्या कापडाला फाडील व छिद्र मोठे होईल.