Mark 2:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि येशूला त्याच क्षणी त्याच्या आत्म्यात समजले की, ते स्वत:शी असा विचार करीत आहेत. तो त्यांस म्हणाला, “तुम्ही या गोष्टीविषयी आपसाात का कुजबूज करत?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते स्वतःशी असा विचार करत आहेत, हे येशूने लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही तुमच्या मनात असे विचार का आणता?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते स्वतःशी असा विचार करत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने1 लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते काय विचार करीत आहेत, हे येशूंनी लगेच त्यांच्या आत्म्यामध्ये ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, “तुम्ही या गोष्टींचा असा विचार का करता?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता?