Mark 3:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करू लागले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग परुशी लगेच बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी हेरोदच्या पक्षातील काही लोकांबरोबर मसलत करू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परूशी बाहेर जाऊन त्याचा (येशूचा) घात कसा करावा ह्याविषयी लगेचच हेरोदीयांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर परूश्यांनी जाऊन येशूंना कसे जिवे मारता येईल याविषयी हेरोदियांबरोबर योजना केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले.