Mark 4:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या वेळी येशू सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला. पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले. मग तो सरोवरातील नावेत बसला आणि सर्व लोक सरोवराच्या किनाऱ्यावरील जमिनीवर होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू पुन्हा गालील सरोवराच्या किनाऱ्यावर प्रबोधन करू लागला. त्याच्याजवळ इतका विशाल समुदाय जमला की, तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला. सर्व लोक सरोवराच्या काठी जमिनीवर होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुन्हा तो समुद्रकिनार्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला; म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला; आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी सरोवराच्या किनार्यावर शिकविण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा त्यांच्याभोवती जमा झालेला समुदाय इतका मोठा होता की, ते एका होडीत बसून किनार्यावरील लोकांना शिकवू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुन्हा येशू सरोवराच्या किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो सरोवरातील एका तारवात जाऊन बसला आणि सर्व लोक सरोवरकिनारी जमिनीवर होते.