Mark 4:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण त्यांनी त वचन आपल्यामध्ये खोलवर रूजू (मुळावु) न दिल्यामुळे ते थोडाच काळ टिकतात. जेव्हा वचनामुळे संकटे येतात किंवा त्रास होतो तेव्हा ते चटकन विश्वास ठेवण्याचे सोडून देतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण त्यांचे मूळ खोलवर न गेल्यामुळे ते अल्पकाळ टिकाव धरतात. त्या वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते तत्क्षणी वचन सोडून देतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण वचनामुळे संकटे आली किंवा त्यांचा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. पण त्यांना मूळ नसल्यामुळे थोडा काळ टिकतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात.