Mark 4:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु तो पेरला जातो तेव्हा तो वाढतो व मळ्यातील सर्व झाडात मोठा होतो. त्याला मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्या सावलीत घरटी बांधू शकतात.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तरी पेरल्यावर उगवून सर्व रोपट्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या फांद्या फुटतात की, आकाशातील पक्ष्यांना त्याच्या सावलीत वसती करता येते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की ‘आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो दाणा वाढून त्याचे झाड होऊन बागेतील सर्वात मोठे झाड होते आणि त्याच्या मोठ्या फांद्यांवर आकाशातील पक्षी विसावा घेऊ शकतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो पेरल्यावर उगवून सर्व झाडांत मोठा होतो. त्यास मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्यावर घरटी बांधू शकतात.”