Mark 5:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने त्यांना तसे करण्यास परवानगी दिली. मग दुष्ट आत्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि त्या डुकरांत शिरले. मग तो दोन हजारांचा कळप टेकडीवरून पळत खाली जाऊन सरोवरात पडला व बुडून मेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्यांना परवानगी दिली. ती भुते निघून डुकरांत शिरली. सुमारे दोन हजार डुकरांचा तो संपूर्ण कळप वेगाने धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने त्यांना परवानगी दिली; तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरांत शिरले, आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली, लगेच अशुद्ध आत्मे त्या मनुष्यातून बाहेर निघाली आणि डुकरांमध्ये शिरली व त्या दोन हजार डुकरांचा कळप डोंगराच्या उतरंडी वरून धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात पडला व बुडाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकारात शिरले आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मरण पावला.