Mark 5:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू नावेतून जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेल्या मनुष्याने त्याला आपणाबरोबर येऊ द्यावे अशी विनंति केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला, “मला आपल्याबरोबर राहू द्या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो मचव्यावर जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की, ‘मला आपल्याजवळ राहू द्या.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू पुन्हा होडीत चढत असताना, जो मनुष्य पूर्वी भूतग्रस्त होता, त्याने आपल्यालाही बरोबर न्यावे, अशी येशूंना विनंती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो तारवात जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य त्यास विनंती करू लागला की, मलाही तुमच्या सोबत घ्या.