Mark 5:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण येशूने त्याला येऊ दिले नाही. तो त्यास म्हणाला, “आपल्या घरी तुझ्या लोकांकडे जा आणि प्रभुने तुझ्यासाठी जे केले ते सर्व सांग. प्रभूने तुझ्यावर कशी दया केली तेही सांग.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु त्याने नकार देऊन त्याला म्हटले, “तू आपल्या घरी आप्तजनांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढे महान कार्य केले व तुझ्यावर कशी दया केली, हे त्यांना सांग.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण येशूंनी ती मान्य केली नाही, परंतु ते त्याला म्हणाले, “आपल्या प्रियजनांकडे घरी जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जे काही केले आणि तुझ्यावर किती मोठी दया केली हे त्यांना सांग.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्याने त्यास आपल्या सोबत येऊ दिले नाही, तर त्यास म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.”