Mark 5:35 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली. ती म्हाणाली, “तुमची मुलगी मेली आहे. गुरुजींना का त्रास देता?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरून काही जण येऊन त्याला म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास का देता?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरूजींना त्रास कशाला देता?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घरून काही लोक आले. ते म्हणाले, “तुमची कन्या मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्यास म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता?”