Mark 5:40 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते सर्व त्याला हसले. त्याने सर्व लोकांना बाहेर घालवून दिले व मुलीचे आईवडील व जे त्याच्याबरोबर होते त्यांना घेऊन जेथे मुलगी होती तेथे आत गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्याला हसू लागले, परंतु त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. मुलीचे आईवडील व स्वतःबरोबरचे तीन शिष्य ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते त्याला हसू लागले; पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले, आणि मुलीचे आईबाप व आपल्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु ते त्याला हसू लागले. त्या सर्वांना बाहेर घालविल्यावर, तिचे आईवडील आणि आपले शिष्य यांना घेऊन त्या बालिकेला ज्या खोलीत ठेवले होते तिथे गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ते त्यास हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर काढून दिले आणि मुलीचे आई-वडील व आपल्याबरोबरचे शिष्य यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला.