Mark 6:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो मरीयेचा मुलगाच ना? तो याकोब, योसे, यहूदा आणि शिमोनाचा भाऊ नव्हे काय? व या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय?” त्याच्या स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन ह्यांचा भाऊ, तो हा सुतार ना? ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” असे म्हणत त्यांनी त्याचा अव्हेर केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो सुतार, जो मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” असे ते त्याच्याविषयी अडखळले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा एक सुतार नाही का? याची आई मरीया आणि याकोब, योसेफ, शिमोन, यहूदाह हे त्याचे भाऊ आहे ना? आणि याच्या बहिणी तर आपल्यातच आहेत ना” आणि ते त्याच्यावर संतापले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो सुतार, मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना?” आणि या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय? त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला.