Mark 6:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व येशू तेथे येण्याअगोदरच ते तेथे पोहोंचले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुष्कळ लोकांनी त्यांना निघताना पाहिले व लगेच त्यांना ओळखले. तेथल्या सर्व नगरांतून लोक त्वरेने पायीच निघाले व त्यांच्या आधी तिकडे पोहोचले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोकांनी त्यांना निघताना पाहिले व पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले; आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले व धावत जाऊन त्यांच्याअगोदर तिकडे पोहचले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनेकांनी त्यांना जाताना पाहिले व त्यांना ओळखले. तेव्हा नगरातील लोक त्यांच्याकडे पायी आले आणि त्यांच्या आधी तिथे पोहोचले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व त्याच्या येण्याअगोदरच ते तेथे पोहोचले.