Mark 6:37 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्याला म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशी दीनारांच्या भाकरी विकत आणाव्या काय?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन चांदीच्या दोनशे नाण्यांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला देऊ?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन दोनशे रुपयांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला द्याव्यात?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावर येशू म्हणाले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” त्यांनी विचारले, “इतक्या लोकांना जेवू घालावयाचे म्हणजे अर्ध्या वर्षाच्या मजुरी पेक्षा अधिक रक्कम खर्च करावी काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्यास म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?”