Mark 8:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते काय बोलतात हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हांला समजत नाही काय? तुमचे अंत:करण कठीण झाले आहे काय?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याची चर्चा का करता? अजून तुमच्या ध्यानात कसे येत नाही आणि अजून तुम्हांला कसे समजत नाही? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे जाणून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही व समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्यांची चर्चा ऐकून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही भाकर नाही याबद्दल का बोलता? अजूनही तुम्ही पाहू शकत नाही किंवा समजू शकत नाही का? तुमची हृदये कठीण झाली आहेत का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते काय बोलत होते हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हास समजूनही समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?