Mark 9:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि जेव्हा तो त्याला धरतो तेव्हा त्याला खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्याला काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जेथे जेथे ते ह्याला धरते, तेथे तेथे ते ह्याला खाली आपटते. मग ह्याच्या तोंडाला फेस येतो आणि हा दात खातो व त्याचे सर्व अंग ताठ होते. ह्याच्यातील भुताला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना ते काढता आले नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो व निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यावेळी दुरात्मा त्याला ताब्यात घेतो, तेव्हा तो त्याला जमिनीवर आपटतो. त्याच्या तोंडाला फेस येतो, क्रोधाने दात खातो आणि त्याचे शरीर ताठ होते. त्या दुरात्म्याला हाकलून लावण्याची आपल्या शिष्यांना विनंती केली, पण ते करू शकले नाहीत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”