Mark 9:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणाले आणि जेव्हा त्या आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळवटून टाकले, तो जमिनीवर पडला आणि तोंडाला फेस आला आणि तो लोळू लागला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. त्या भुताने येशूला पाहताच मुलाला पिळवटून टाकले आणि तो मुलगा जमिनीवर पडून तोंडाला फेस येऊन लोळू लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याप्रमाणे ते मुलाला घेऊन आले. पण दुरात्म्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्याने त्या मुलाला झटके आणले आणि तो मुलगा जमिनीवर पडून लोळू लागला व त्याच्या तोंडामधून फेस येऊ लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला.