Mark 9:38 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भुते काढताना पाहिले आणि आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला कारण तो आपल्यापैकी नव्हता.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योहानने त्याला म्हटले, “गुरुवर्य, कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना आम्ही पाहिले. त्याला आम्ही मना केले कारण तो आपला अनुयायी नव्हता.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योहान त्याला म्हणाला, “गुरूजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणाएकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले. आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यातील नव्हता.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भूते काढताना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आपल्यापैकी नव्हता.”