Mark 9:43 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा व्यंग असून जीवनात जाणे बरे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुझा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक. [दोन हात असून नरकात, म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे ह्यापेक्षा एका हाताविना जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.]
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुझा हात अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन हात असून नरकात जावे व न विझणार्या अग्नीत जाण्याऐवजी एका हाताने अधू होऊन जीवनात प्रवेश करणे अधिक हिताचे होईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.